जीवनाचा वेग वाढत चालला आहे, त्यामुळे धावपळ वाढली आहे. वेग वाढला कारण ज्याने तो वाढविला तो स्पर्धेत पुढे पळताना दिसतो आहे आणि जो पुढे पळतो आहे त्याला इतरांपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतो आहे. आर्थिक प्राप्ती वाढलीच पाहिजे कारण जगण्यासाठीच्या बहुतांश गरजा त्यातून भागतात. त्या भागविण्यासाठी किती पैसा लागतो, या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता येत नाही. खरे म्हणजे देता आले पाहिजे पण प्रत्येकाच्या गरजांची इतकी भिन्नता आपण मान्य केली आहे की अब्जाधीशही आपल्याकडे पुरेसा पैसा आहे, हे मान्य करत नाही. त्याला कोणीतरी त्यापेक्षा श्रीमंत माणूस दिसायला लागला की पैसे कमावण्याच्या स्पर्धेत तो नव्याने भाग घ्यायला लागतो. आज अब्जाधीशाची ‘भूक’ जेथे भागत नाही, तेथे खालच्या उत्पन्नगटातील समूहाची ‘भूक’ भागण्याचा संबंध कोठे येतो ?
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत या संदर्भाने एक फार चांगले वाक्य आहे. ते आधुनिक समाजाच्या भूकेला चपखल लागू पडते. ते असे आहेः ‘ गेल्या पाच हजार वर्षांत कोणती महानगरं टिकली आहेत ? महानगरं उद्ध्वस्त व्हायला कुर्हाडी न् रथ कशाला लागतात ? ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल,गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदललं, की हे फुग्यासारखे फुटतात. फाऽट, फाऽट...’ स्वतःला खाणारा असा एक नागरी समाज आपल्या आजूबाजूला सतत तयार होतो आहे की काय, असा प्रश्न वर्तमानात प्रत्येक क्षणी पडायला लागला आहे. न भागणारी ‘भूक’ अशी सर्वव्यापी व्हायला लागली आहे.
आधी पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी झटणारी माणसं ते प्रश्न थोडे बाजूला पडले की जीवनात स्थैर्य शोधायला लागतात. स्थैर्य मिळालं की जीवनाचा अर्थ शोधायला लागतात. जीवनाचा अर्थ म्हणजे नेमके काय, हे मात्र स्पष्ट करणं अवघड आहे. त्याची व्याख्या करता येत नाही, कारण जीवनाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. पेच असा आहे की प्रत्येकाचा जीवनाचा अर्थ वेगळा असला तरी तो केवळ वैयक्तिक प्रयत्नांनी साध्य होत नाही. त्याला स्वतःसोबतच परिसराची, समूहाची आणि निसर्गाची साथ मिळावी लागते. आधुनिक समाज स्वतःला सोडून पुढील तीनही घटकांना विसरला आहे, असे सध्याच्या सार्वजनिक जीवनाकडे आणि संभ्रमित माणसांच्या टोळ्यांकडे पाहिल्यावर म्हणावे लागते.
आधुनिक म्हणविणार्या सध्याच्या नागरी समाजाने आपले आयुष्य किती वेदनामय करून घेतले आहे , हे गेल्या आठवड्यातील एका दिवसाचे वर्तमानपत्र वाचल्यावर अधिक अधोरेखित झाले. या घटनांची नोंद ही एका दिवसाची असली तरी हे वर्तमान आपण दररोजच वाचतो, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.म्हणजे ‘आज’ चा ‘काल’ दररोजच होत असतो. त्या दिवसाच्या वर्तमानात पाकिस्तानच्या पुरस्थितीतील भुकेल्यांची कहाणी होती. एकीकडे कोटयवधी रूपयांची करचुकवेगिरी उघडकीस आली होती तर दुसरीकडे करांच्या ओझ्याने वाकलेल्या नागरिकांना प्राप्तिकरात नव्या बदलांचे आमिष केंद्र सरकारने दाखविले होते. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाऊ इच्छिणार्या पाच न्यायाधीशांनी परीक्षेत कॉपी केली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर सेवेतून निलंबित होण्याची वेळ आली होती. शहरात प्रचंड रोगराई वाढल्यामुळे रूग्णालये कमी पडताहेत, अशी वेळ या समुहावर आली होती. दोन शहरे जोडण्यासाठीच्या महामार्गांवर लुटमारीच्या घटना वाढल्याची नोंद त्याच दिवशी होती. याच नागरी समाजात कसेबसे जीवन कंठणार्या अपंग उद्योजकांना आपल्या मालावर व्हॅट कर नको म्हणून मागणी करण्याची वेळ आली होती. त्याच प्रकारचा नागरी समाज चीन देशामध्ये जगतो, तेथे एका महामार्गावरील वाहतुककोंडी म्हणे महिनाभराने सुटणार होती. जगाच्या दुसर्या टोकाला त्याच प्रकारच्या कोंडीने नागरीक दररोज परेशान झाल्याची बातमी त्याच पानांवर होती. एका महापालिकेने आपल्या हद्दीबाहेरून येणार्या रूग्णांसाठी जादा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे एका गावातील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी कामावर येत नसल्याने तेथील शिपाईच ते चालवत होता ! आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका नगरात सुट्या पैशांची चणचण निर्माण झाल्याचे वृत्त होते. तेथील बँकेला म्हणे पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याने सुटी नाणी आणायची भीती वाटत होती. मला वाटते वानगीदाखल एवढया घटना पुरेशा आहेत. ‘जगाचा आरसा’ असे आपण माध्यमांना म्हणतो. कालच्या जगाची म्हणजे पर्यायाने आजच्या जगाच्या आरशात नागरी समाज असा असुरक्षित, भांबावलेला, तणावग्रस्त असा दिसतो आहे.
दररोजच्या या नोंदीमध्ये काय दिसते पाहा... अंतिमतः जीवनाचा अर्थ शोधायला निघालेला हा समूह आपल्या परिसरातील अभावग्रस्त परिस्थितीने परेशान झाला आहे. ज्यांच्या जीवनातील भौतिक अभाव संपला आहे, ती माणसेही पुढ्च्या काही प्रलोभनांसाठी वखवखली आहेत. जेथे आपण वेग वाढविला आहे, असे वाटायला लागले होते, तेथे असुरक्षितेने ग्रासले आहे. वाढलेल्या रोगराईतून आपली सुटका नाही, या चिंतेने त्याचा ताबा घेतला आहे. आपल्यातील दुर्बलांना जगण्याचे साधन दिले पाहिजे, याविषयी दुमत नसलेल्या या समाजात त्यासाठी अधिक काही करण्याची वेळ येते तेव्हा मात्र एकमतासाठी झटावे लागते. याच आधुनिक समाजावर हद्दीतले आणि हद्दीबाहेरचे रूग्ण असा भेद करण्याची नामुष्की आली आहे. त्या नगरापासून जवळच असलेल्या गावात तर रूग्णांवर आपला जीव रूग्णालयातील शिपायाच्या हवाली करण्याची वेळ आली आहे. सुट्या पैशांची चणचण निर्माण होण्याच्या घटनेने तर आधुनिक समाजाच्या अंगावरील राहिलीसुरली वस्रही काढून टाकली आहेत. आमच्या आधुनिक समाजाचा दररोजचा दिवस असा उगवतो आणि असाच मावळतो, मग यात जीवनाचा अर्थ आपण कसा शोधणार आहोत ?
या सर्व वर्तमानाचा मी एक अर्थ घेतला तो म्हणजे माणूस ज्या रस्त्याच्या शोधात निघाला होता, तो हा रस्ता खचितच नव्हे. काहीतरी गडबड आहे, एवढे नक्की. ही जी गडबड आहे, तिचा विचार आपण या ‘अर्थपूर्ण’ मध्ये करणार आहोत. केवळ गडबडीची चर्चा करून थांबणार नाही, तर जगाचे व्यवहार शक्य तितक्या प्रामाणिक, संवेदनशीलतने झाले पाहिजेत आणि माणूसपणाची प्रतिष्ठा कोणत्याही ‘इझम’ मध्ये जपलीच पाहिजे , असे ठामपणे वाटणार्या सर्वांच्या मनात नेमके काय दडून बसले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे.
संपादक म्हणून काम करताना एका सज्जन माणसाने मला एक प्रश्न विचारला होता. ‘जगात घडणार्या वाईटच घटना जणू माध्यमे एकत्र करतात, असे अनेकदा वाटते. खरे तर जीवन सुसहय व्हावे यासाठी प्रयत्नशील असणारी कितीतरी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. ती एकांडे शिलेदार म्हणून काम करत आहेत. त्यांची मात्र माध्यमे ठळक दखल घेत नाहीत. त्यांचे काम समाजासमोर आणत नाहीत, असे का ? ‘ मी त्या क्षणाला काही उत्तर देऊ शकलो नाही. मात्र माझ्या मनातून त्या वाचकाचा प्रश्न जातच नव्हता. पण मी लगेचच अशी माणसे शोधायला सुरवात केली. अशी खूप माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, हे लगेच लक्षात आले. माध्यमांमध्ये व्यावसायिकतेला महत्व देण्याच्या नावाखाली काय होते आहे, हे दिसतच होते. मात्र त्यात आपण काय करू शकतो, हे लक्षात येत नव्हते. एक दिवस ते लक्षात आले. मी ‘उकल’ नावाचे सदर लिहायला सुरवात केली. आपले दररोजचे जीवन अर्थपूर्ण करणार्या माणसांना समाजासमोर आणण्याची संधी मी घेतली आणि त्या सज्जन माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आपण सर्वच जण अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात आहोत. वैयक्तिक जीवन आणि त्या पाठोपाठ सार्वजनिक जीवन अर्थपूर्ण करण्याची आज गरज आहे. ही गरज पूर्ण कशी करता येईल, तसा प्रयत्न करणारी कोणती माणसं आहेत, जगातल्या कोणत्या व्यवस्थांनी जीवन अर्थपूर्ण करण्याच्या वाटा शोधल्या आहेत, त्यांच्या कोणत्या पावलांवर पाऊल टाकले तर जीवन अर्थपूर्ण होण्यास मदत होईल, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ‘अर्थपूर्ण’ हा प्रवास आहे.
Tuesday, September 7, 2010
Thursday, September 2, 2010
हे खरे की ते खरे ?
एका दैनिकाची नव्याने सुरू झालेली पुरवणी अशात वाचनात आली. पुरवणीचा विषय पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर असला तरी या पुरवणीत विशिष्ट भागातील बांधकामविषयक घडामोडींवरच भर देण्यात आला होता. पुणे, पिंपरी-चिंचवडचा कसा वेगाने विकास होतो आहे, हे वर्णन सध्या वेगवेगळया पद्धतीने केले जाते आहे आणि वेगाने होणारी बांधकामे यालाच विकास असे नाव दिले जाते आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते. ही संपादकीय मजकूराची पुरवणी होती, हे नमूद केले पाहिजे. केवळ जाहिराती मिळण्यासाठी हल्ली स्वतंत्र पुरवण्या काढल्या जातात, त्याप्रकारची ही पुरवणी नव्हती. या पुरवणीतील मुख्य म्हणजे पहिल्या पानावरील लेख वाचून धक्का बसला. संपादकीय मजकुराची निवड या पद्धतीने होउ लागली तर वाचकांनी त्यावर विश्वास का ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होतो.
या लेखातील काही उल्लेख कसे शिताफीने करण्यात आले होते, हे लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे दिली पाहिजेत. ‘...... या भागात राहायला येणार्यांची संख्या कमालीची वाढली आहे.’, ‘ या सर्व सेवासुविधांमुळे ...... हे नवीन आकर्षक ठिकाण झालेले असून नव्याने पुण्यात येणार्यांकडून या भागाला प्राधान्य दिले जात आहे.’, ‘ पाणी, रस्ते आणि वीज याचा तुटवडा आता राहिलेला नाही. रस्ते चकाचक झाले असून आता पाण्याचाही तोटा नाही.’ ‘ हा रस्ता चौपदरी केल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.’ ‘विशेष म्हणजे.... महापालिका पायाभूत सुविधा पुरविण्यात आघाडीवर आहे.’, ‘ सेवासुविधांच्याबाबतीत कोठेही कमतरता नसल्याने नवे पुणेकर होणार्या लोकांकडून या भागात राहायला येणार्यांची संख्या वाढली आहे.’, ‘ हा परिसर आता अलिशान इमारतींनी सजला आहे.’, ‘ गेल्या काही वर्षांत .... या भागाचा कायापालट झालेला दिसतो.’
ही वाक्ये उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातील काही विधाने बातमीदार असलेल्या लेखकाची आहेत तर काही बांधकाम व्यावसायिकांची आहेत. पण मजकूराची सरमिसळ अशी करण्यात आली आहे की ती नेमकी कोणाची आहे, हे परि्च्छेदाच्या अखेरपर्यंत गेल्याशिवाय लक्षातच येत नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड्च्या ज्या नव्या भागांचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे, त्या भागातील अलिशान इमारती आणि सेवासुविधांची छायाचित्रे त्यात वापरलेली आहेत. विशेष म्हणजे या पुरवणीत प्रामुख्याने लेखात नमूद केलेल्या भागातीलच जाहिराती आहेत. त्याही बांधकाम व्यावसायिकांच्या आहेत. त्याचा पुढचा भाग अधिक आक्षेपार्ह आहे. तो म्हणजे ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आहेत, त्याच चार जणांच्या मतांना लेखात स्थान देण्यात आले आहे. जाहिरातींसाठीची पुरवणी म्हणूनच ती प्रसिद्ध झाली असती तर हे सर्व एकवेळ समजण्यासारखे होते, मात्र संपादकीय मजकूराची पुरवणी असताना मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडण्यात आला आहे ! शिवाय जाहिरातीच्या आकारानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रियांना प्राधान्य देण्यात आले आहे !
असा मजकूर पाहिल्यावर काही प्रश्न मनात येतात, ते असेः वस्तुस्थिती वाचकांपर्यत पोचविण्याच्या कर्तव्यामध्ये या प्रकारच्या मजकूराने कसूर केली नाही का ?, इतर वेळी सेवासुविधांच्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात येते मग त्यात कमतरता राहिलेली नाही, असे विधान दुटप्पीपणाचे नाही काय ?, संपादकीय मजकूराचा आणि जाहिरातींचा असा थेट संबंध जोडणे ही वाचकांची फसवणूक नाही काय ?
छापील शब्दांवर लोकांचा आजही विश्वास आहे, असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण या पद्धतीची फसवणुक होत राहिली तर तो वेगाने कमी होत जाईल. ज्याने आपले आर्थिक हितसंबंध जपले त्याच्या नावाचा जयजयकार हे राजकारणात आपण नेहमी पाहतो. आता हा मिंधेपणा माध्यमांमध्ये दिसायला लागला आहे. आपल्या मालाची, सेवेची जाहिरात करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे त्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यासाठी फक्त जाहिरातींना वाहिलेल्या पुरवण्या काढल्या जातात. या पुरवणीतला मजकूर जाहिरातदारांना पूरक असतो. माध्यमांची ही गरज आता सर्वांनीच मान्य केली आहे. मात्र या प्रकारच्या संपादकीय पुरवण्यांमध्ये अशी सरमिसळ करणे, ही वाचकांची घोर फसवणूकच आहे.
नागरिकांचा संभ्रम दूर करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे, मात्र अशा मजकुराद्वारे तो संभ्रम वाढविला जातो आहे. माध्यमांचा कारभार व्यवसाय म्हणून चालला आहे, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही, मात्र ज्यावेळी वाचक, श्रोता आणि दर्शक याच्या फसवणुकीत माध्यमेच सहभागी व्हायला लागली तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा ?
यमाजी बाळाजी मालकर / ymalkar@gmail.com

Tuesday, August 17, 2010
केवळ युनिकोड नव्हे, ‘मराठी युनिकोड’
मराठी फॉण्टच्या आणि की-बोर्डच्या गदारोळात आणखी फॉण्ट्स आणि की-बोर्डची गरज आहे काय, याचे उत्तर ‘नाही’ असेच असायला हवे. मात्र जगातल्या पंधराव्या क्रमांकाच्या आणि एका उत्कृष्ट भाषेच्या वाटयाला जी अवहेलना आली आहे, ते पाहता ती गरज आहे, असेच म्हटले पाहिजे. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, ती सोप्या पद्धतीने वापरता आली पाहिजे, मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, संगणकात वापरताना ती कोठेही कमी पडता कामा नये आणि हे स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, या चार गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. हे चारही निकष पुर्ण करणारा फॉण्ट आणि कीबोर्ड आपल्याला हवा आहे. मराठी भाषेच्या व्यवहारातील आणि पर्यायाने संगणकातील वापरावर ज्या मर्यादा आल्या आहेत, त्याची कारणे म्हणजे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. सरकार, मराठी भाषाविकासाचे निर्णय घेणारे धुरीण आणि ती वापरणारे मराठीजन यांची स्थिती एक हत्ती आणि सहा अंधांसारखी झाली आहे. कोणाला व्याकरण कळते तर संगणक कळत नाही, संगणक कळतो तर भाषा कळत नाही आणि ज्यांना वापर करायचा ते वेगवेगळे प्रयोग करून परेशान झाले आहेत. या प्रवासात मराठी भाषेचे न भरून येणारे नुकसान होते आहे.
आता प्रश्न असा आहे की या अडथळयांवर मात करणारा काही मार्ग आहे का ? हो , आहे आणि मराठी समाज आणि सरकारने त्याचा शक्य तितक्या लवकर अवलंब केला पाहिजे. ‘शोध मराठीचा’ या संशोधनाने अलिकडेच शोधून काढलेला ‘मराठी युनिकोड’ (केवळ युनिकोड नव्हे ) हा त्यावरचा मार्ग निश्चितपणे ठरू शकतो.
वर ज्या चार निकषांचा उल्लेख केला, ते चारही निकष ‘मराठी युनिकोड’ने पुर्ण केले आहेत. त्यामुळे तो महाराष्ट्र सरकार, मराठी विकासासाठी काम करणार्या सरकारी अनुदानित संस्था, शाळा- महाविद्यालये आणि सर्वच मराठीजनांनी स्वीकारण्याची गरज आहे. मराठी भाषेला यापुढे संगणकात वावरावेच लागणार आहे आणि त्यासाठी हे निकष पुर्ण करणारे फॉण्ट आणि की-बोर्ड स्वीकारावेच लागणार आहेत, हे या विषयातील तज्ञांनी समजून घेतले तर मराठी भाषेसमोरची आव्हाने पेलणे सोपे होणार आहे.
‘मराठी युनिकोड’ हे चार निकष कसे पुर्ण करतो, हे आता आपण पाहू. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, हा पहिला निकष आहे. मायक्रोसॉफ्ट्ने युनिकोड दिला, याचा अर्थ संगणकात मराठीसारखी भारतीय भाषा वापरण्यातील अडथळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने दूर केले. याचा अर्थ त्यांनी काही भारतीय भाषांची मोट घातली आणि त्याला युनिकोड नाव दिले. त्यांनी तंत्र म्हणून जे अडथळे दूर केले , त्याबद्द्ल त्यांचे आभार मानून ‘मराठी युनिकोड’ पुढे जातो. ( मायक्रोसॉफ्ट्चा युनिकोड महाराष्ट्रात विकल्या जाणार्या प्रत्येक संगणकात ‘ऑन’ असलाच पाहिजे, इतका साधा नियम करायला मात्र आमच्या महाराष्ट्र सरकारला आणि मराठीच्या नावाने गळे काढणार्यांना वेळ नाही!)
मराठी सोप्या पद्धतीने संगणकात वापरता आली पाहिजे, हा दुसरा निकष आहे. मराठी लेखन ‘बाराखडी’ या सुत्रातून सहजतेने शिकता येते, हे लक्षात घेवून स्वर आणि व्यंजनांना की-बोर्डवर स्थान देण्यात आले आहे. संगणक इंग्रजांनी बनविले आणि त्यांनी ‘क्वेर्टी’ कीबोर्ड आपल्याला दिला. त्याचा वापर करून तो 90 टक्के फोनेटिक करण्यात आला आहे. तो इतका सोपा आहे की मराठी टाईप न करणारा माणूसही सहजपणे टाईप करायला लागतो. जोडाक्षरे टाईप करायला अवघड वाटतात, ती जोडाक्षरेही खूपच सोपी करण्यात आली आहेत.
मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, हा तिसरा निकष आहे. सध्या मराठी अक्षरे टाईप करताना सतत तडजोडी करा किंवा मराठीची मोडतोड करा अशी जणू सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे भाषेचे नुकसान होते, हे लक्षात घेतले पाहिजे.‘मराठी युनिकोड’ मध्ये 100 टक्के मराठी टाईप करता येते. दुसर्या भाषेच्या कुबडया त्यासाठी घ्याव्या लागत नाहीत. तरीही ती जगाशी जोडली जाते कारण इंग्रजी की-बोर्ड आणि मराठी याचा सुवर्णमध्य त्यात साधण्यात आला आहे. इंग्रजी बोलता न आले तर शाळांमध्ये मुलांना चटके देणार्या लाचार मनोवृत्तीच्या समाजात हा सुवर्णमध्य अपरिहार्यच म्हणावा लागेल.
संगणकात वापरताना मराठी भाषा कोठेही कमी पडता कामा नये, हा तिसरा निकष आहे. ‘मराठी युनिकोड’ मध्ये फाईल, फोल्डर यांना मराठीत नावे देणे शक्य होते, तसेच ईमेल. वेबवर आणि इंग्रजी भाषा वापरली जाते अशा सर्व ठिकाणी मराठी वापरता येते. थोडक्यात संगणकात मराठी वापराचे दालन 100 टक्के खुले होते.
‘मराठी युनिकोड’ चे सूत्र स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, हा चौथा निकष आहे. आता हे सूत्र 100 ते 200 रूपयांना उपलब्ध आहे. सरकारने पुढाकार घेतला तर ते मराठीजनांना मोफतही उपलब्ध करता येवू शकते. मराठी भाषा विकासासाठी हा पुढाकार अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारने या कारणी कोटयवधी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. हा प्रश्न मुळातूनच संपविण्याची संधी ‘मराठी युनिकोड’ च्या माध्यमातून आली आहे.
भाषाविकासाची गाडी संगणकाचे इंजीन लावल्याशिवाय आता पुढे जावू शकत नाही. मराठीच्या संगणकातील वापरात एकसूत्रता आणण्यासाठी तरूणवर्ग आसुसला आहे. इंग्रजी वापरणारा वर्ग वेगाने वाढत चालला असून त्याला सोप्या पद्धतीने मराठी वापरायची आहे, तर संगणकक्रांतीला मुकलेल्या आधीच्या पिढीलाही संगणक वापरायचा आहे. इंग्रजी आणि मराठीत शिक्षण घेणार्या मुलांना आता संगणकाच्या मदतीने मराठी शिकायची आहे. परदेशातील मराठी मुलांनाही मराठी सोपेपणातून आत्मसात करायची आहे. या सर्वांसाठी ‘मराठी युनिकोड’ शिवाय पर्याय नाही.
प्रश्न आहे हा विषय समजून घेण्याचा आणि शक्य तितक्या लवकर त्याची अमलबजावणी करण्याचा !
( अधिक माहितीसाठी www.shodhamarathicha.com /www.soppimarathi.com )
यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Thursday, June 10, 2010
मार्केटिंगचे ‘फिरंगी फटके’
बाजारात सध्या अनेक लढाया सुरू आहेत. या लढाया काय थराला जावू शकतात, याचे एकएक नमुने पाहायला मिळत आहेत. भारतात सध्या मोबाईल फोनची चलती असून ती ‘कॅश’ करण्यासाठी किमान डझनभर कंपन्या एकमेकींशी स्पर्धा करत आहेत. मोबाईल ही या दशकात जणू जीवनावश्यक वस्तू झाली आहे. आगामी काही वर्षांत तिचा महागाई निर्देशांकांच्या निकषांमध्ये समावेश झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मोबाईल सेवेच्या मार्केटिंगवाले एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत.
मार्केटिंगच्या या कुरघोडीमध्ये नैतिकतेचे भान कसे हरवत जाते, हे जाहिरातींमध्ये आपण दररोज पाहात आहोत. असेच एक ताजे उदाहरण समोर आले असून आता या स्पर्धेत कोणीच मागे राहायला तयार नाही आणि कोणालाच त्याच्या परिणामांशी काही देणेघेणे राहिलेले नाही, हेच त्यातून उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांत मोबाईल सेवा पुरविणार्या कंपन्यांनी ग्राहकांवर एसएसएमचा मारा चालविला आहे. या एसएसएमद्वारे अश्लील संदेश पाठवून पैसा कमावणे आणि सेवेची ‘लोकप्रियता’ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी बीएसएनएल कंपनीही या स्पर्धेत उतरली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी कंपन्यांनी मार्केटिंग करताना नैतिकता सोडू नये, अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा बर्यापैकी पाळली जात होती. मात्र त्यांना खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास भाग पाडण्यात आले आणि खाजगी कंपन्या ज्या प्रकारचे मार्केटिंग करतात, त्या प्रकारचे मार्केटिंग करण्याची एकप्रकारची मुभा देण्यात आली.
माणूस, संस्था, संघटना आणि कंपन्यांमध्ये मार्केटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे. ते करताना तुम्ही समाजाच्या भल्याचा, प्रामाणिकपणाचा विचार करता की नाही, हा विचार गौण ठरायला लागला. व्यवहारात प्रत्येक ‘निर्मात्या’ला दुकान मांडून बसावे लागते, हे मान्यच करावे लागते. मात्र जेव्हा तो व्यवहार इतरांच्या नुकसानावर, दुसर्याच्या फसवणुकीवर बेतला जातो, तेव्हा मात्र त्याचा निषेध करणे अपरिहार्य ठरते.
बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या एसएसएमचा समोर आलेला मुद्दा या प्रकारच्या मार्केटिंगशी संबंधित आहे. बीएसएनएलने ग्राहकांना एसएसएमद्वारे पाठविलेल्या लिंक उघडल्यानंतर महिलांची अर्धनग्न छायाचित्रे दिसतात, असे लक्षात आले. या सगळया प्रकाराला कंपनीने ‘फिरंगी फटका’ असे नाव दिले आहे ! या ‘फटक्यांची’ अनिमेशन दरमहा 30 रूपयांना दिले जात आहेत. आयडिया या मोबाईल कंपनीनेही याच प्रकारचे एसएसएम पाठविले आहेत.
मार्कैटिंगचा आणखी एक धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला. अश्लील एसएसएमवरून पुण्यात वाद उभा राहिल्यानंतर आयडिया सेल्युलर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत मुखर्जी यांनी जो खुलासा केला आहे, तो पाहिल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात येईल. त्यांचा खुलासा शब्दशः असा- ‘अश्लील एसएसएम आयडिया सेल्युलरने पाठविलेला नाही. सर्व मोबाईल कंपन्यांना विपणन सेवा पुरविणार्या बंगरूळूरमधील एका कंत्राटदाराने तो पाठविला आहे. त्याबाबत पोलिस चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी विनंती कंपनीतर्फै पोलिसांना करण्यात आली आहे.’ याचा अर्थ असा होतो की आपल्या कंपनीच्या नावावर गेलेल्या एसएसएमची जबाबदारी आता ही आणि इतर कोणतीच कंपनी घेणार नाही ! सेवेचे असे तुकडे तुकडे पाडले की जाब कोणाला विचारायचा हे कोणालाच कळत नाही. आणि हा विषय मागे पडतो. काही दिवसांनी पुन्हा पुर्वीसारखेच सर्व सुरू होते. विमा आणि बँकांनीही याच प्रकारची नीती अवलंबली आहे. माल विकताना पायघड्या आणि सेवेचा मुद्दा आला की सेवेपेक्षा करामतींवर भर असा जणू प्रघातच पडतो आहे.
मार्केटिंगच्या शिक्षणात नेमके काय सांगितले जाते, ते शोधले पाहिजे. मात्र त्या शिक्षणात अलिकडच्या काळात नैतिकता गुंडाळून ठेवा आणि माल खपवा अशा मंत्राचा बोलबाला होताना दिसतो आहे, असेच म्हणावे लागेल. आपले उत्पादन चांगले आहे, हे कंपन्याना एकतर पुरेसे वाटत नाही किंवा त्यांची भूक एवढी वाढली आहे की हाव सुटत नाही. चांगले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी नाना क्लृप्त्या कराव्या लागतात, हे पुर्वापार चालत आले आहे. त्याविषयी तक्रार असण्याचे कारण नाही आणि तसा अधिकारही कोणाला नाही. मात्र ज्यावेळी प्रलोभनाच्या सीमारेषा ओलांड्ल्या जातात, त्यावेळी त्याची दखल घ्यायलाच हवी. विशेषतः ज्यामुळे समाजस्वास्थच बिघडण्याची शक्यता आहे, त्याविषयी सरकार आणि समाजधुरीणांनी बोललेच पाहिजे. ते तसे बोलण्याचे , त्यासंबंधीचा निर्णय घेणे टाळले जाते आहे की काय, हेही तपासण्याची वेळ आली आहे.
मार्केटिंगचे टोक गाठून समाजाला आणि विशेषतः गरीबांना कसे वेठीस धरले जाते, याचे अमेरिकन समाजातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. अमेरिकेत ज्यावेळी घरे विकली जात नव्ह्ती त्यावेळी बँका आणि वित्तसंस्थांनी ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखवून घरे घ्यायला लावली . लाखो लोकांनी घरे घेतली, मात्र त्यांना खर्चाची तोंडमिळवणी करता येईना . कर्जे थकली. ती इतकी थकली की घरांची जप्ती मोहिम हाती घेण्यात आली. जप्त केलेल्या घरांची संख्या प्रचंड वाढली आणि घरांच्या किमंती कोसळल्या. या अनैतिक व्यवहारातून जागतिक मंदीने जन्म घेतला. अमेरिकन समाजासोबतच सारे जग मंदीत होरपळून निघाले. मार्केटिंगच्या अतिरेकामुळे जागतिक समाजच अडचणीत आला. ही केवळ आर्थिक होरपळ होती, असे आपल्याला म्हणता येत नाही. अशा आर्थिक संकटांमध्ये समाजावर सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होतात. मार्केटिंग करणार्याने त्याचे काम चोख बजावले, आता त्याच्या परिणामांशी आम्हाला काही देणेघेणे नाही, ही किती चुकीची भूमिका आहे, हे म्हणूनच समजून घेतले पाहिजे.
बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या अश्लील एसएसएम किंवा लिंकचा विचार या संदर्भाने केल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात यावे. आमच्या मार्केटिंगचा समाजावर आणि विशेषतः मुलांवर काय परिणाम होतो, याच्याशी आमचे देणेघेणे नाही , असे म्हणणार्यांची संख्या वाढत गेली की सगळा समाजच अशा विकृतींनी पोखरून निघतो. त्या विकृतींचा त्रास तर होतो मात्र ती थांबविण्यासाठी स्पर्धेला लगाम लावणे नको वाटते, हे समाजाच्या निकोप वाढीचा विचार करता चांगले लक्षण नव्हे.

Friday, April 23, 2010
जखमेवर मीठ चोळणा-या ‘सर्कशी’
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या तसेच आर्थिक असमानतेचे टोक गाठलेल्या देशासाठी अर्थक्रांती ही नवी संकल्पना सुचवूनही आता एक दशक उलटून गेले. औरंगाबादचे एक उद्दोजक श्री. अनिल बोकील यांनी ही संकल्पना मांडली आहे. म्हटले तर ती अतिशय साधी आहे. सध्या सर्व नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ३३ प्रकारचे कर भरतात, त्याएवजी दोनच प्रकारचे कर भरतील. त्यातला एक सीमाशुल्क आणि दुसरा ‘व्यवहार कर’. साधारण २००० किंवा ५००० रूपयांवरील रोखीचे व्यवहार होणार नाहीत, असा कायदा करण्यात येईल. एक हजार आणि पाचशेसारख्या मोठ्या नोटांची व्यवहारात मग गरज राहणार नाही, त्यामुळे त्या रद्द करण्यात येतील. थोडक्यात बँकेमार्फत आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येईल. व्यवहारकराद्वारे जमा होणा-या निधीचे वाटप केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येईल, अशी ही संकल्पना आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून अनेक उच्चपदस्थांनी या संकल्पनेची वाहवा करून झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासंदर्भात ठोस काही होताना दिसत नाही. या संकल्पनेची आठवण या महिन्यात फार तीव्रतेने झाली.
त्याचे एक प्रमुख कारण आयपीएल नावाची सर्कस. या सर्कशीवर भारतवाशी १५ हजार कोटी रूपये उधळतो, या प्रकारची जी भयानक आकडेवारी समोर आली आहे आणि त्यानंतर प्राप्तिकर खात्याचे जे छापासत्र सुरू आहे, ते होय. घरी खायला दाणे नसलेल्या माणसाने नशा करून झिंगण्यासारखे हे आहे. संपत्ती- पैशाचा हा जो उतमात चालला आहे, ते व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावामुळे आपण रोखू तर शकत नाही, मात्र ज्या भ्रस्ट व्यवस्थेने हे घबाड त्यांच्या हातात दिले आहे, ती व्यवस्था तर दुरूस्त करू शकतो. त्या दुरूस्तीचा तर्कसंगत मार्ग शोधायचा झाल्यास आपल्याला अर्थक्रांती संकल्पनेची आठवण ठेवावीच लागते.
श्री. अनिल बोकील यांनी दिलेले एक चांगले उदाहरण मला आठवते. त्यांच्या मोलकरणीने आगाउ पैसे मागितल्यावर त्यांनी दोन वेळा हातउसणे पैसे दिले आणि तिस-या वेळी मात्र तिचा पगार बँकेतून करायला सुरूवात केली. दोन वर्षांनंतर जेव्हा तिला मोठ्या कर्जाची गरज पडली तेव्हा ते तिला जामिनदार राहिले शिवाय बँकेतून पगार केल्यामुळे तिची पत तयार झाली आणि त्या प्रमाणात बँकेने तिला कर्ज मंजूर केले. बँकव्यवहार वाढल्यामुळे एका सामान्य नागरिकाच्या आयुष्यात झालेला हा क्रांतिकारी बदल ठरला. सांगण्याचा मुद्दा हा की १२० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला अशा बदलांची गरज
आहे. ते होत नाहीत म्हणून आयपीएल आणि त्यासारख्या शेकडो सर्कशी सामान्य माणसाच्या जखमेवर दररोज मीठ चोळत आहेत.
सरकारने अनेक उपाय योजूनही नक्षलवादी चळवळीला मिळणारा स्थानिक नागरिकांचा पाठिंबा कमी होताना दिसत नाही, यातच सर्व काही आले. नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात कवडीमोल जीवन जगणा-या नागरिकांना हा देश आणि ही व्यवस्था आपली वाटेनाशी झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात असे कोणाला वाटले असते तर ते समजण्यासारखे होते. मात्र ६० वर्षांनी लाखो लोकांच्या मनात तीच भावना राहते, याच्या कारणांचा विचार करावाच लागणार आहे. जेव्हा एक व्यवस्था म्हणून काही नवी रचना करावी लागेल, त्यावेळी अर्थक्रांतीची संकल्पना मान्यच करावी लागते. वाईट याचे वाटते की इकडे आयपीएलसारख्या सर्कशी आणि दुसरीकडे व्यवस्थेने नाकारलेल्यांची संख्या वाढतेच आहे.
ही दरी दैनंदिन व्यवहारात कशी काम करते आहे, याचे एक उदाहरण येथे दिले पाहिजे. आपण शहरातला एखादा गजबजलेला रस्ता नजरेसमोर आणू यात. आपल्याला असे दिसते की भारीतली भारी कार, बस, रिक्षा, दुचाकी, सायकल, हातगाडी आणि पादचारी त्याच रस्यावरून जात असतात. साहजिकच प्रत्येकाची गती वेगळी आहे. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. थोडक्यात एकाच रस्यावरून २०-२५ प्रकारची वाहने चालली आहेत आणि आपल्याला त्या रस्त्यावर शिस्तबध्द वाहतूक हवी आहे... मग ती आणण्यासाठी त्यातले जे गरीब आहेत त्यांना त्या रस्त्याबाहेर काढण्याचा मार्ग आपण निवडला आहे. ज्याच्याकडे अतिशय मर्यादित साधने आहेत, त्यांना या शिस्तीचा जाच होतो आहे, पण त्याच्याशी सरकारला काही देणेघेणे नाही. मग तो नियम तोडायला लागतो, त्यालाच आपण बेशिस्त म्हणतो. पण ज्यांनी आर्थिक शिस्त तोडली आहे, त्यांनी ती तोडल्याबद्दल शिक्षा होतेच, असे नाही. आयपीएलच्या बोलींचे आकडे पाहिल्यावर ही विसंगती कोणाच्याही लक्षात येईल. कमी काळात इतका प्रचंड पैसा कोणाकडे कसा येउ शकतो, यासाठी संशोधनाची गरज नाही.
चांगले जगणे आणि हौसमौज सर्वांनाच हवी आहे, त्यात बाधा आणण्याची कोणाची इच्छा नाही आणि तसे ते बरोबरही नाही. मात्र एका देशाचे नागरिक म्हणून नाते निर्माण व्हायचे असेल तर प्रत्यक्ष नवनिर्मिती करणा-यांच्या वाट्याला येत असलेली अवहेलना रोखायलाच हवी.शेतीत धान्य पिकविणारा शेतकरी, शरीरकष्टाची कामे करणारा मजूर यांच्या वाट्याला आज जे जिणे आले आहे, त्याकडे पाहता ही चांगली व्यवस्था आहे, असे
म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. कोट्यवधी रूपयांची माया जमविणा-या बहुतेकांनी ती किती भ्रष्ट मार्गांनी जमविलेली असते, हे एखाद्या प्रकरणाने जगासमोर येते. त्यामुळेच आयपीएलकडे त्या नजरेने पाहिले जाते आहे, हे आश्चर्य नव्हे.
जगात गरीब देश आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही, आता गरीब देशातले श्रीमंत आणि श्रीमंत देशातील श्रीमंत एकीकडे आणि गरीब देशातले गरीब आणि श्रीमंत देशातले गरीब – अशी जगाची फाळणी झाली आहे, असे जे म्हटले जाते, त्याचीच प्रचिती येवू लागली आहे. ही दरी कमी करण्याची जबाबदारी अर्थातच पहिल्या जगाची आहे. कारण त्यांना चांगले जगायचे असेल तर इतरांनाही जगू देण्याचे औदार्य त्यांना अंगी बाणावेच लागेल. नाहीतर जवान स्फोटांमध्ये मरत आहेत, स्टेडियमच्या शेजारी स्फोटके सापडत आहेत आणि रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे, ही सर्व परिस्थिती या वाढत्या दरीनेच निर्माण केली आहे. ती आटोक्यात न आणल्यास सर्वांनाच जीव वाचवत वाचवत जगावे लागणार आहे.
यमाजी मालकर , ymalkar@gmail.com

Thursday, April 15, 2010
वेग हा जुलमी गडे !
गेल्या दोन तीन दशकांत जग जितक्या वेगाने बदलले, तितके ते पुर्वीच्या शंभर वर्षांत बदलले नाही, असे म्हणण्याची पध्दत आहे. खरे म्हणजे जग म्हणजे जगातला माणूस काळानुसार बदलतच येथपर्यंत पोहचला आहे. एक मात्र खरे की जगाचा वेग या दोन तीन दशकात प्रचंड वाढला आहे. पुर्वीही जगाला वेग होताच मात्र तो असा माणसाच्या नसानसांत भिनला नव्हता. या वाढत्या वेगाचे परिणाम शहरात दिसतात तसेच ते ग्रामीण भागातही दिसायला लागले आहेत.
वाढत्या वेगाचे परिणाम प्रवासात अधिक दिसतात. लोकलने प्रवास करणारे मुंबईकर त्याचा दररोजच अनुभव घेत आहेत. मात्र माझ्यासारख्या मुंबईबाहेरच्या माणसाला याचे फार कुतुहल वाटते. उदा. लोकलमधील सुरवातीच्या डब्यांमध्ये बसायचे की शेवटच्या, हे ठरते ते लोकलमधून उतरल्यावर कोठे जायचे आहे, त्यावर. म्हणजे दादरा चढायला लागू नये, किंवा पायी चालण्यात वेळ जावू नये, हा विचार लोकलमध्ये बसतानाचा करायचा, हे अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. नाहीतर बाहेरून आलेला माणूस आपल्याला गाडीत प्रवेश मिळाला, यातच समाधान मानतो. परवा मुंबईत जे पाहिलं, ते स्टेशनांवरचं नेहमीचं दृश्य आहे, त्याचंही मला कुतुहल वाटलं. दोन मिनिटे आधी निघणारी गाडी आली म्हणून उभ्या गाडीतील माणसं पटापटा त्या आधी जाणा-या गाडीत जावून बसली ! या दोन मिनिटांना पुर्वी आपल्या आयुष्यात हे स्थान नव्हते.
ग्रामीण भागातीलही मानसिकता वेगामुळे कशी बदलत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे आता पाहायला मिळत आहेत. तेथील स्थानकांवरही असे प्रसंग दिसत आहेत.गावांत ‘काळ्यापिवळ्या’ जीपने सर्रास प्रवासी वाहतूक चालते. तेथे आपली गाडी आधी भरावी यासाठी तिचे इंजिन चालू ठेवले जाते. परवा तर पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर हे दृश्य मी पाहिले. बस कोल्हापूरकडे जाणार होती आणि त्या दिशेने जाणा-या चार तरी बस उभ्या होत्या. प्रवासी मात्र एकाच गाडीत बसत होते, ज्या गाडीचे इंजिन चालकाने चालू करून ठेवले होते ! ‘चलतीका नाम गाडी’. जी गाडी लगेच निघणार तीच गाडी सर्वांना हवी होती.
आता बस पाहिली जाते ती ‘ मेगा हायवे’वरून जाणारी. जी बस हायवे सोडून खाली उतरते, ती कोणालाच नको आहे. त्यामुळे ही ‘ मेगा हायवे’ ही अक्षरे गाड्यांच्या पाट्यांवर ठळक अक्षरात विराजमान झाली आहेत. तब्बल ३०० किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये काम संपवून परत घरी मुक्कामी येणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पुर्वी वर्दळीच्या मार्गांवर चार- पाच किलोमीटरवर धाब्यांसमोर गाड्या उभ्या दिसायच्या. आता नुसतेच धाबे दिसतात. तेथे थांबणा-या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्याचेही कारण वाढता वेग हेच आहे. वेग वाढण्यासाठीच रस्ते चांगले झाले आणि त्याचा पुरेपूर वापर प्रत्येकाला करायचा आहे. मेगा हायवेला अडथळा होउ नये म्हणून गाव आले की प्रचंड उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरील त्या गावाची ओळखच पुसली जाणार आहे. मात्र जीवनाच्या वाढत्या वेगात ते अपरिहार्य ठरले आहे.
या वेगाचा आणखी एक फार खोल परिणाम ग्रामीण भागात होतो आहे. महामार्गावरील गावे वाढत चालली आहेत. मूळ गाव जर महामार्गापासून आत असेल तर महामार्गाच्या कडेने वस्ती वाढत चालली आहे. महामार्गाच्या ‘वाटेने’ सोयीसुविधा येतात आणि ‘आत’ असलेल्या गावात त्या पोहचायला वेळ लागतो, त्यामुळे हायवेच्या आजूबाजूच्या जागा भरत चालल्या आहेत.
या वाढत्या वेगात वंगण ओतले ते मोबाईलने. मी निघालो, मी निम्म्या रस्त्यावर पोहचलो, आता गाडीतून उतरलो, आता रिक्षा मिळाली, आणि हे काय .. मी आपल्या घराच्या दारातच आहे, अशी जणू येण्याजाण्याची कॉमेंट्री करण्याची सुविधाच या यंत्राने दिली आहे. पत्रव्यवहाराची जागाही मोबाईलने घेतली. येण्याजाण्याची कॉमेंट्री केली जाते तेथे सुखदुःखाच्या गोष्टींसाठी आता प्रत्यक्ष भेटण्याची वाट कोण कशाला पाहील ?
संवाद साधण्यासाठी, निरोप देण्यासाठी जो कालावधी लागत होता, तोच संपुष्टात आला आहे. हे चांगले की वाईट हे ठरविण्याला किंवा त्याची चर्चा करायलाही आता मानवी समूहांना वेळ नाही. कारण या बदलांमध्ये आणि वेगात प्रत्येकजण ओढला जातो आहे.
कधीकधी वाटते, वेग म्हणजे जणू जागा पटकावण्याची स्पर्धा आहे. ज्याने वेग वाढविला त्याने जागा पटकावली. अर्थात हे तत्व तर पुर्वीपासूनच आहे. मात्र गेल्या अर्धशतकात जागा पटकावण्याचा हा वेग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये जसे ज्यांना जागा मिळत नाही , त्यातले काहीजण दोन बाकांच्या मध्ये जाउन उभे राहतात., म्हणजे कोणी सहप्रवासी आधी उठला तर ती जागा आपल्याला मिळावी.आणि उभे राहण्याची ही जागाही वेगानेच मिळवावी लागते.
जगातले खरे बदल हे विज्ञान, यंत्र आणि तंत्रातले बदल आहेत. ते आधी होतात आणि माणूस त्यानुसार बदलतो, असे म्हटले जाते. आणि जे खरेच आहे, याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. पण या बदलांनी माणूस इतका वेगवान करून टाकला आहे की तो वेग हेच जणू जगणे आहे, असा एक भ्रम तयार होतो आहे. या वेगाने आणखी एक ‘देणगी’आपल्याला दिली आहे, ती म्हणजे गतिमान अस्थैर्याची. म्हणजे खूप काही घडते आहे आणि त्या घडण्याचे अस्तित्व किती काळासाठी आहे, हे कोणालाच सांगता येत नाही. स्थैर्यासाठी सुरू झालेला प्रवास संपल्यासारखा वाटतो, पण घडीभरच. लगेच दूरचे क्षितीज दिसायला लागते, माणसे त्यादिशेने झेपावतात, आणि मग प्रवासाचे टप्पे मोजायला सुरवात करणा-यालाही शांत बसवत नाही. त्यालाही त्या स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. वाढत्या वेगाने हे जे गतिमान अस्थैर्य दिले आहे, त्याच्याविषयी जगातील माणसांनी कधीतरी एकमेकांशी बोलले पाहिजे. हितगुज केले पाहिजे.. पण हा ‘कधीतरी’ नावाचा काळ वर्तमानात कधी येणार आहे, हे कोण सांगू शकणार आहे ?

Friday, April 2, 2010
गाव का झिजते आहे ?
जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत भारत आणि इंडिया अशी आपल्या देशाची फाळणी झाली, याविषयी आता कोणाचे दुमत राहिलेले नाही.या फाळणीविषयी चिंता व्यक्त केली जात नाही, असा एकही दिवस जात नाही. देशातील संपत्तीत या दोन दशकांत किती वाढ झाली, असाच विचार केला तर आपला देश खूप श्रीमंत झाला आहे, मात्र त्या संपत्तीच्या वितरणाचा विचार केला तर ही फाळणी किती भयंकर आहे, हे लक्षात येते. शहरातले चित्र कळायला तुलनेने सोपे आहे, मात्र ग्रामीण भागात नेमके काय घडते आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच ‘गांव झिजते आहे’ हे अंबाजोगाईत राहणा-या डॉ. द्वारकादास लोहिया यांचे पुस्तक मला महत्वाचे वाटले. (प्रकाशक- सतिश आणि छाया काकडे, आशिव, ता. औसा, जि.लातूर) जागतिकीकरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके काय होते आहे आणि काय व्हायला हवे, हे समजून घ्यायचे असेल तर त्या परिसरात राहून आपली निरीक्षणे नोंदवणारांची संख्या वाढली पाहिजे.
डॉ. द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या पत्नी डॉ.शैला लोहिया हे दाम्पत्य ‘मानवलोक’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली २७ वर्षे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भागात काम करतात.या अनुभवाची जोड या निरीक्षणांना मिळाली असल्याने या पुस्तकाचे मोल अधिक आहे.गावांची स्थिती विशेषतः अर्थव्यवस्था कशी खंगत चालली आहे, हे तर डॉ. लोहियांनी विशद केले आहेच, पण हे थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हेही मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच तुलनेने श्रीमंत राज्यात पुण्यामुंबईबाहेर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणा-यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.
महात्मा गांधी खेड्याकडे चला असे का म्हणत होते आणि ग्रामस्वराज्याच्या त्यांच्या कल्पनांमध्ये काही बदल करून पण आज त्याच कशा महत्वाच्या आहेत, हे कळायला या पुस्तकामुळे मदत होते. जागतिकीकरणाच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या कल्पना प्रत्यक्षात किती उतरतील, हे प्रश्नचिन्ह या दशकातही कायम राहील, मात्र हे बदलले पाहिजे, असे मानणारे धुरीण सत्तेवर आल्यावर त्यांना याच कल्पनांचा विस्तार करावा लागणार आहे, हे निश्चित.
‘गाव झिजत आहे’ या पुस्तकातील काही कल्पना अशा आहेतः सरकारी कर्मचारी गावातच राहण्यासाठी त्यांना गावात स्वस्त घरे देण्याची व्यवस्था करावी. महिलांच्या बचत गटाचा विस्तार होउन त्यातून त्यांच्याच पतसंस्थांची निर्मिती झाली पाहिजे. शेती हा व्यवसाय किंवा उद्योग आहे, हे लक्षात घेवून त्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा आधिकार असला पाहिजे. जल, जंगल आणि जमीन यावर समस्त गावक-यांची मालकी असली पाहिजे. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे, यासाठी गावातले व्यवहार वाढले पाहिजेत. याचा अर्थ ग्रामीण जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज डॉ. लोहिया व्यक्त करत आहेत.
पुस्तकात २१ प्रकरणे आहेत. त्यांची नावे जरी पाहिली तरी आपल्याला त्या विषयांच्या महत्वाची कल्पना येते. उदा. गावातला नोकर गावात, गुळाचे गु-हाळ तसे साखरेचे साखराळ, एक कुटुंब- एक उत्पन्नाचे साधन, बोअरचे पाणी पिण्यासाठी- पावसाचे पाणी शेतीसाठी, तर आत्महत्या थांबतील, यंत्रे आली- जनावरे कमी झाली,गावचा धर्म –शेजार धर्म , नारी के सहयोग बिना हर गाव सुना है.. ,गावकुसातील संसाधनांची चोरी, महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ.
गाव का झिजत आहेत, याचे खूप चांगले विश्लेषण या पुस्तकात आले आहे. त्यातल्या काही नव्या गोष्टी अशाः ‘महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ’ या प्रकरणात नोकरदाराची पगारवाढ आणि शेतीमालाची थेट तुलना करून ही तफावत लक्षात आणून दिली आहे. यात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘ कच्चा माल तयार करणारा आणि पक्का माल तयार करणारा यांच्या उत्पन्नातील तफावत मला दिसते आहे. ही तफावतदेखील शेतक-याच्या आत्महत्यांना कारणीभूत होते आहे.म्हणून शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणि समृध्दीसाठी महागाईचा निर्देशांक काढण्याची पध्दत बदलावी लागेल.’ दुसरी एक गोष्ट अशी आहेः ‘ साखर विक्रीची पध्दत बदलली पाहिजे. ती पध्दत पिठाच्या गिरणीसारखी असावी.पिठाच्या गिरणीत ग्राहक ज्वारी किंवा गहू घेवून जातो.गिरणीमालक त्याचे दळण दळून पीठ तयार करून देतो. त्याला दळणाचे पैसे दिले जातात. साखरेचा कारखाना ही पिठाची गिरणी समजावी. साखरेच्या उता-याप्रमाणे त्याने घातलेल्या उसाच्या मोबदल्यात त्याला साखर मिळावी.’
डॉ. लोहिया जे म्हणतात ते लगेच पटते आणि मग आपण विचार करतो खरोखरच असे बदल आता आपल्या देशात होतील? जागतिकीकरणाने ‘अपमार्केट’कडे जाणारी मानसिकता घडवली आहे. ती मानसिकता सांगते, शहरात चला. ती सांगते आता ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, हेच तत्व बरोबर आहे. मुलांचे चांगले शिक्षण शहरांतच होते, शेजारधर्माने नव्हे तर स्पर्धेने प्रश्न सुटतात. हाताने होणा-या कामांपेक्षा यंत्रांनी होणारी कामे चांगली होतात. गावातल्या प्रश्नांपेक्षा महानगरांतले प्रश्न महत्वाचे आहेत कारण ते सोडविल्यामुळे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होतात. सरकारीपेक्षा खासगीकरण चांगले. सगळ्यांचे लक्ष असे ‘अपमार्केट’ कडे आहे. ‘अपमार्केट’ कडे पाठ फिरवून हे परिवर्तन घडविण्याची इच्छाशक्ती आपल्या समाजात दिसते आहे काय?
मग लक्षात येते की आजच्या मानसिकतेत या कल्पनांचा विचार करायला तयार होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही. जागतिकीकरणाने गतिमान अस्थैर्याचा जो शाप आम्हाला दिला आहे, त्यामुळे आमचे विचारच गोठून गेले आहेत. आता आम्ही एकतर्फीच विचार करू शकतो. सर्वसमावेशक विचारांची शक्तीच आम्ही गमावली आहे. आम्ही आमच्या ‘अजेंड्या’वर इतकं प्रेम करायला लागलो आहोत की त्यामुळे दुस-यांचे गळे कापताना आमचे हात अडखळत नाहीत. उलट त्या गळेकापू स्पर्धेचे आम्ही समर्थन करतो. या परिस्थितीत डॉ. लोहिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे पाहिले तर मनात निराशा दाटून येते.पण त्या प्रश्नांकडे पाठ फिरवूनही आम्ही आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळेच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. ती परिस्थिती समोर आणण्याचे काम डॉ. लोहिया यांनी चोख बजावले आहे. आता ‘भारता’सहच ‘इंडिया’ला पुढे जायचे आहे, असे ज्यांना ज्यांना वाटते , त्यांनी ही विसंगती दूर करण्यासाठी झटायचे आहे.

Subscribe to:
Posts (Atom)